दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. गतिशील, कृतिशील आणि विचारशील सरणीतुन काहीतरी नवीन नियम, निश्चय अथवा संकल्प करण्याचा दिवस. बहुधा जुने काहीतरी सोडून नवीन आचरण्याचा नियम. जुनाट विचार सोडून नवीन विचार अवलंबणे किंवा जुन्या रूढ़ी, कर्मकांड पूर्णपणे बंद करून नवीन परंपरा आत्मसात करणे. पण दरवेळेस जुने काहीतरी मागे सोडून नवीन आत्मसात करणे म्हणजेच सीमोल्लंघन का? कारण जस की रूढ़ी, परंपरा याच्या अति अमलाखाली राहिल्याने जसे आपण कालबाह्य गणले जाउ शकतो तसेच पाश्चात्य व प्रगत संस्कृतिच्या जर तंतोतंत आहारी गेलो तरी सुद्धा आपण कालबाह्य च होतो ना. त्यामुळे प्राचीन परंपरा आणि प्रगत संस्कृति या दोन्हीचा समन्वय साधण गरजेचे आहे. नवीन येणा-या गोष्टींचा अवश्य स्वीकार करावा पण जे पीढिजात आणि पूर्वापार चालत आल आहे ते सोडू नये. कारण सद्यस्थिति अशी आहे की जुन्या पिढीला नवीन विचार पटत नाहीत आणि नवीन पिढीला जुने विचार बुरसटलेले वाटतात. जुन्या विचारात नवीन पीढ़िच्या दृष्टीने जरी काही logic नसल तरी ते आचरण्यामागे नक्कीच काहीतरी तथ्य असत जे कालांतराने आपल्याला समजेल. शेवटी म्हणतात ना, "जुनं तेच सोनं". माझ्या मते या दस-यापासून खर सीमोल्लंघन हेच असेल की जे पारंपारिक आणि प्रगत संस्कृति या दोन्ही गोष्टीना बांधून ठेवेल, त्या दोहोंचा मिलाफ़ घडवून आणेल. दोन्हींचा समन्वय जर आपण जुळवून आणला तर आपोआपच दोन पिढ्यातील विचारात काही अंतर च उरणार नाही आणि साहजिकच वर्षानुवर्षे चालत आलेली ही "Generation Gap" बंद होईल आणि हेच ख-या अर्थाने यशस्वी सीमोल्लंघन ठरेल.
धन्यवाद!
कु. आनंद लेले
เคฎเคธ्เคค เคฒेเค!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
DeleteSpashta ani muddesud vichar mandani. Masta lekh.
ReplyDeleteเคซाเคฐเค เคाเคจ
ReplyDeleteเคธुเคฐेเค
mast lihilayas...
ReplyDeleteAmazing ๐๐
ReplyDeleteเคूเคชเค เคธुंเคฆเคฐ เคตिเคाเคฐ เคเคนे. เคธเคเคณ्เคฏांเคจी เคฎिเคณूเคจ เค ंเคฎเคฒเคฌเคाเคตเคฃी เคेเคฒ्เคฏाเคธ เคซाเคฏเคฆेเคถीเคฐ เคนोเคเคฒ.
ReplyDeleteChimu
Chhan ch
ReplyDeleteเคुเค เคธुंเคฆเคฐ เคฒिเคนिเคฒं เคเคนेเคธ เคเคจंเคฆ. เคน्เคฏा เคตเคฐ เค ंเคฎเคฒเคฌเคाเคตเคฃी เคेเคฒी เคจा เคूเคช เคฌเคฐं เคนोเคเคฒ.
ReplyDelete